लॉकडाऊनच्या काळात गरजूंना आमदार राजू नवघरेंनी केली मदत

लॉकडाऊनच्या काळात वसमत मतदारसंघातील कोणत्या गावात कोण गरजू आहेत त्‍याची माहिती घेत अशा गरजूंना धान्यासह किराणा सामान वाटप करून वसमतचे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार राजू नवघरे यांनी मदत केली आहे. तसेच आरोग्य विभागाकडे देखील असणाऱ्या सुविधाबाबत चर्चा करून अत्‍यावश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा केला आहे.
 Raju navghare helps people in vasamat during lockdown 
Raju navghare helps people in vasamat during lockdown 

वसमत - लॉकडाऊनच्या काळात वसमत मतदारसंघातील कोणत्या गावात कोण गरजू आहेत त्‍याची माहिती घेत अशा गरजूंना धान्यासह किराणा सामान वाटप करून वसमतचे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार राजू नवघरे यांनी मदत केली आहे. तसेच आरोग्य विभागाकडे देखील असणाऱ्या सुविधाबाबत चर्चा करून अत्‍यावश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा केला आहे.

लॉकडाऊमुळे सध्या आमदार नवघरे घरीच आहेत. घरी असताना कार्यकर्त्यांसोबत मोबाईलवर बोलून कोणत्या गावात कोणत्या मदतीची आवश्यकता आहे, याची माहिती घेत गरजूंपर्यत मदत पोहचती केली आहे. मतदारसंघातील जवळा बाजार येथे भाजीपाला तसेच धान्याचे वाटप केले. आडगाव येथे कार्यकर्त्यांमार्फत बिस्‍कीट पुड्यासह इतरही खाद्य पदार्थाच्या पुड्याचे वाटप केले.

वसमत येथील एक पॉझिटीव्ह रुग्ण निघाल्याने शहरात कडक बंदोबस्‍त ठेवण्यात आला नागरिकांना अडचणी होणार नाहीत यासाठी जीवनावश्यक वस्‍तुच्या विक्रीची दुकाने काही तास सुरू करण्यासाठी जिल्‍हाधिकारी यांच्या सोबत चर्चा करून दुकाने काही वेळासाठी खुली केली. तसेच उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलिस निरिक्षक, आरोग्य विभागासह इतर कर्मचाऱ्याची आढावा बैठक घेतली.

वसमत शहरात फिरून नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले. तसेच आपल्याला जी गरज लागेल त्‍यासाठी मला फोन करा. मी घरपोच मदत देणार असल्याचे त्‍यांनी सांगितले. तसेच मतदारसंघातील ग्रामीण भागात देखील स्‍वच्‍छतेबाबत सूचना केल्या. पोलिस प्रशासनाला व आरोग्य विभागाला नागरीकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. शहरातील खासगी डॉक्‍टरांची बैठक घेवून दवाखाने सुरु करण्याची विनंतीही त्यांनी केली.

अनेक गावातील रस्‍ते बंद करण्याबाबत देखील सूचना दिल्या. वसमत मतदारसंघात बाहेर राज्यासह पुणे, मुंबई आदी मोठ्या शहरातून आलेल्या नागरिकांची सक्‍तीने आरोग्य तपासणी करावी, अशा सूचना संबंधित विभागास दिल्या. शेतातील कामे सुरूच ठेवा मात्र ती करताना सोशल डिस्‍टन्सिंग पाळा अशा सुचना शेतकऱ्यांना दिल्या. वाडी तांड्यासह इतर गावातील गरजुंना अन्नाची पाकिटे पुरविली आहेत. तसेच धान्याचे देखील वाटप करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील नागरीकांनी शहरात अत्यावश्यक काम असेल तरच यावे अन्यथा घरीच थांबावे असे सांगितले.

दानशुरांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत निधी देण्याचे आवाहन देखील केले आहे. आमदार रोहित पवार यांना जिल्‍ह्यात सॅनिटायझरचे देण्यासाठी विनंती केली होती. ती त्‍यांनी मान्य करीत 475 लिटर सॅनिटायझर जिल्‍हा प्रशासनाकडे दिले आहे. तसेच वसमत मतदारसंघातील सर्वच नागरिकांनी शासनाच्या सुचनाचे पालन करीत घरातच थांबावे. घराच्या बाहेर कोणी पडू नये, असे आवाहन श्री. नवघरे यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com